स्वामी स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धी मासाच्या २०व्या दिवशीच १० कोटी १० लाख ठेवी संकलीत. भरगोस प्रतिसाद ! कृतज्ञ मी कृतार्थ मी- अँड. दीपक पटवर्धन.
* स्वामी सावरूपानंद पत संस्था आणि ग्राहक सभासद यांच नात केवळ व्यावहारिक नाही तर हे नात आंतरिक जिव्हाळयाच्या ,विश्वासार्हतेच्या ऋणानुबंधान चे आहे. त्यामुळेच संस्थेच्या प्रत्येक सादेला समज्याच्या प्रत्येक स्तरातून उत्सपूर्त प्रतिसाद मिळतो आणि स्वरूपानंद च्या सर्व शाखा आषाढधारे प्रमाणे ठेव वर्षावाने चिंब भिजून जातात.या ठेव वृद्धी मासाच्या २०व्या दिवशी नवीन १० कोटी १० लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. *ठेव वर्षावाने सर्वच शाखा ओल्याचिंब* ह्या प्रतिसादाने मन चिंब चिंब होऊन गेले आणि सहज भावाने कृतार्थ मी कृतज्ञ मी अशीच भावना मनात जागत आहें अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यानी व्यक्त केली. *कठोर व्रत मात्र निखळ यश* ३४ वर्षांचा हा अर्थप्रवास म्हणजे एक कठोर व्रतच आहे २२ हजार च्या घरात असलेली ठेव खाती स्वामी स्वरूपानंद चा व्यापक विस्तार दर्शवते.आर्थिक शिस्त, वक्तशीर पारदर्शक व्यवहार यातून स्वरूपानंद ची आर्थिक ताकद सातत्यने वाढते आहे. *सुरक्षितत आणि विश्वासार्ह संस्था* आपलीं गुंतवणूक सुरक्षित ठेउन त्यावर आकर्षक व्याज परतावा प्राप्त करण्याचे ठिकाण म्हणजे स्वरूपानंद पत संस्था असे समिकरण जनमानसात निर्माण करता आले हेच या सातत्याचे गमक आहे. *स्वरूप कुटुंब*स्वरूपानंद ही कुटुंबातल्या ऐका व्यक्ती पूर्ती मर्यादित नाही ती अखंड कुटुंबाला आपली पत संस्था वाटते यातच यश दडले आहे. *सशक्त अर्थकारण* या ठेव वृद्धी मासात आज अखेर १०कोटी नवीन ठेवी संकलित झाल्या त्यामुळे ऐकूण ठेवी ३१८ कोटींच्या पुढे गेल्या असून २२०कोटींच कर्ज वितरण तर १४३ कोटींच्या बँक गुंतवणुका, ४३ कोटींचा स्वनिधी २४% इतकी लक्षणीय भांडवल पर्याप्तता ९९.३९% इतकी वसुली अशी भक्कम स्थिती ठेवीदाराना सहज आकृष्ट करते. *सुरक्षित आकर्षक व्याज परताव्याच्या योजनेत गुंतवणूक करा*या योजनेचे अजून १०दिवस शिल्लक आहेत त्याचा लाभ घेऊन अधिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक स्वरूपानंदच्या ठेव योजनेत करावी आणि कमाल ८.५०% व्याज परतावा प्राप्त करावा असे आवाहन अँड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.