रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून कोकणी जनतेचा घास हिरावू पहणाऱ्या यापुढे थारा नाही, खासदार नारायण राणे यांनी दिला सज्जड दम
राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरीच्या विरोधात मुंबईत रिफायनरी विरोधकांनी आंदोलन सुरू केले असतानाच आता नूतन खासदार नारायण राणे यांनी या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होणारच असे जाहीर केले आहे त्यामुळे परत एकदा रिफायनरी समर्थक व विरोधक आमने-सामने येण्याची वेळ आली आहेकोकणच्या आर्थिक विकासासाठी आणि या प्रकल्पाच्या माध्यमातुन भावी पिढीला रोजागराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पुर्ण होणारच आहेया प्रकल्पाला विरोध करून कोकणी जनतेचा घास हिरावू पहणाऱ्या यापुढे थारा नाही, जे या प्रकल्पाला विरोध करतील, विरोधासाठी येतील त्यांना परत जाऊ देणार नाही असा सज्जड ईशारा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी राजापुरात दिला. पक्षाचे राजकारण न करता लोकांच्या पोटाचे राजकारण करा असा सल्लाही यावेळी खा. राणे यांनी प्रकल्प विरोधकांना दिला.साडेतीन लाख हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे संपुर्ण कोकणचेच नाही तर राज्य आणि देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा. राणे यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाला केवळ उध्दवमियाँचाच विरोध असल्याचा टोला लगावताना विरोध करणाऱ्यांनी कोकणी माणसाच्या भवितव्याचा, तरूणांच्या रोजागाराचा कधी विचार केलाय काय?असा खडा सवाल खा. राणे यांनी यावेळी उपस्थित केला.www.konkantoday.com