
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात टँकरचा खासगी आरामबससह टेम्पोला धडक देत अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आंबा पॉईंटजवळ मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास तेल वाहतुकीचा टँकरने खासगी आरामबससह टेम्पोला धडक देत अपघात केला. अपघातात टँकरचालक अहमद ( रा. सुफियान नसीम उत्तरप्रदेश) यास किरकोळ दुखापत झाली. टँकरचालक सुफियान
अहमद हा तेल वाहतुकीचा टँकर ( एम. एच. ४३बी.जी. ८१५७) घेवून महाड येथून गोवा येथे जात होता. टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या खासगी आरामबसला
एम. एच. ४६- बी.एम. २६९० ) धडक दिली. यानंतर टेम्पोलाही (एम.एच. ०८ ए.पी. ४४२५) पाठीमागून धडक दिली. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
www.konkantoday.com