
रत्नागिरीत मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभेत आरोप
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळ उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन ही कंपनी अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एकाा मंत्र्याचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागामध्ये कामे घेवून प्रचंड मोठा घोटाळा केला असल्याचे आरोप यावेळी त्यांनी केले.यावेळी या कंपनीने केलेल्या कारभाराची ३ उाहरण देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारचे शेकडो कोटींचे अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.www.konkantoday.com