
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सावर्डेतील त्या २ कात कंपन्याना बंदचे आदेश
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील दोन कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या दूषित पाण्यासह शेतीचेही नुकसान अनेक वर्षे भोगावे लागत होते. या कातभट्ट्यांमुळे निर्माण होणार्या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. अखेरीस ग्रामस्थांच्या या आंदोलनाला निलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आले असून या दोन्ही कातभट्ट्या ७२ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिले आहेत.ग्रामस्थांच्या या समस्यांची दखल घेवून भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या भागाला भेट देत शासनाकडे याचा पाठपुरावा केला होता. सावर्डे येथील कातभट्टीच्या जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना होत होता. कातभट्टीचे पाणी नाल्यातून थेट नदीमध्ये जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली होती. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. तसेच बोअरवेल आणि विहिरींना प्रदूषित पाणी येत होते. गेली कित्येक वर्षे हा त्रास ग्रामस्थ सहन करत होते. यासंदर्भात अनेक वेळा आवाज उठवूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. www.konkantoday.com