दापोली येथील खेम धरणात बुडालेल्या कल्पेश रुपेश बटावळे याचा शोध घेण्यासाठी एन.डी.आर.एफ टीम आज दापोलीत
दापोली येथील खेम धरणात बुडालेल्या कल्पेश रुपेश बटावळे याचा शोध घेण्यासाठी एन.डी.आर.एफ टीम आज दापोलीत दाखल होणार असून त्यांच्या मार्फत आता शोध घेतला जाणार आहे कालसायंकाळी ४ वाजेपर्यंत १८ तास उलटून सुद्धा हर्णै खेम धरणात बुडालेल्या मुलाचा अजूनही शोध लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रयत्न सुरू होता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्णै खेम धरणामध्ये ही घटना घडली. परवा सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तन्मय संतोष पड्याल, तुषार संतोष पड्याल, सोयल सौजन्य थोरे आणि कल्पेश रुपेश बटावळे हे सर्व आंजर्ले गावापासून जवळपास असलेल्या सातांबा गावातीलच आहेत. हे चौघेही हर्णै धरणात पोहायला आले होते. त्यावेळी हे दुर्दैवी घटना घडली होती