
विनापरवाना वाहतूक करणार्यांकडून दापोली महसूल विभागाकडून सहा लाखांचा दंड वसूल.
दापोली महसूल विभागाने सोमवारी रात्री मंडणगड ते खेड विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ४ डंपर पकडले. त्यांच्याकडून तब्बल ६ लाख १५ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोठ्या कारवाईमुळे दापोली महसूल विभागाचे कौतूक होत आहे. मंडल अधिकारी पालगड, दापोली, दाभोळ व त्यांच्या अधीनस्त तलाठी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.www.konkantoday.com