चिपळूण नगरपालिका सज्ज, नगरपरिषदेकडून धूर फवारणी
चिपळूण शहरात आजार येवू नयेत म्हणून नगर परिषद खबरदारी घेताना दिसत आहे. सध्या धूर, मशीन फवारणीसह पाखाड्या व आवश्यक त्या ठिकाणी टीसीएल पावडर टाकली जात आहे.पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे ते टाळण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्व विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाणीपुरवठा विभाग काळजी घेत आहे. तर आरोग्य विभागाने शहरातील नियमित साफसफाईबरोबरच वाढलेली झाडी तोडण्यास सुरूवात कली आहे. मच्छरांचा त्रास होवू नये म्हणून शहरात धूर फवारणी, मशिन फवारणी करण्यात येत आहे. तसेच पावसामुळे गुळगुळीत झालेल्या पाखाड्या, लहान रस्ते यावर टीसीएल पावडर टाकून ते स्वच्छ केले जात आहेत.www.konkantoday.com