
चिपळूण तालुक्यातील आबिट गावची सुकन्या अनन्या खेराडे सुपरस्टार
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असलेल्या कलात्मकतेला जिद्द, चिकाटीची जोड दिली की ही व्यक्तीमत्वे जगासमोर येतात. हेच तालुक्यातील अबिटगावची सुकन्या अनन्या विजय खेराडेने सिद्ध करून दाखवले आहे. १३ जुलैपासून सुरू होत असलेल्या स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या गायन कार्यक्रमासाठी तिची निवड झाली. अनन्याच्या सुरांच्या जादूला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भरभरून दाद दिली आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातील अनन्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत आहे. कलेच्या क्षेत्रात विशेष रूची असलेल्या अनन्याने गावस्तरासह शाळेत होणार्या सांस्क्तिक कार्यक्रमातून जादुई सुरांचा ठसा उमटवला आहे. अवघ्या ९ वर्षाची असणार्या अनन्याने अंगीकृत गुणवत्तेवर उत्तुंग झेप घेतली असून स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे ×उस्ताद या गायन कार्यक्रमासाठी तीची निवड झाली आहे. या कार्यक्रमात निवड झालेल्या छोट्या कलाकारांनी आपापली गीते सादर केली आहेत. सध्या ती सावर्डे येथील शारदा संगीत कला क्रीडा अकादमी गुरूवर्य वरद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे घेत आहे. www.konkantoday.com