
रत्नागिरी करानाे डांबरीकरण केलेल्या रस्त्यांच्या साइडपट्ट्यावरुन जायचे धाडस करताना विचार करा!
रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यानी नुकतेच पत्रकारांशी बोलताना शहरातील रस्त्यांबाबत वस्तुस्थिती मांडली पंधरा दिवस पाऊस न आल्यास रस्त्याचे डांबरीकरण करू असेही त्यांनी सांगितले तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेळ आल्यास पाच दिवसांतही रस्त्याचेडांबरीकरण पूर्ण करण्याची किमया असल्याचे सांगितले नळपाणी योजनेच्या पाइपची खोदाई झाल्यानंतर शहरातील काही भागात सध्या रस्त्याचे डांबरीकरण व साइडपट्ट्यांचे काम सुरू आहे या साइडपट्ट्यांच्या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत झाडगाव परिसरात
या साइडपट्ट्यांच्या तकलादू कामामुळे नगरपरिषदेची कचरा गाडी रुतल्याचा प्रकार झाला असताना खालची आळी बंदर राेड रस्त्याचे डांबरीकरण झालेल्या रस्त्यातील साइडपट्टीत मातीने भरलेला ट्रॅक्टर रुतण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे आता रत्नागिरीकरांना साइडपट्ट्यांवरून जाताना थोडे धाडस करून जावे लागणार आहे
www.konkantoday.com