कला शिक्षिका सौ. प्रांजल घोसाळे यांच्या कल्पकला चित्रकला प्रशिक्षण वर्गाचा सौ.नेहा पित्रे यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी दि. (प्रतिनिधी) : कला शिक्षिका सौ. प्रांजल घोसाळे यांच्या रत्नागिरी येथील चित्रकला प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ दिनांक ७ जुलै रोजी गुरुकुल संस्थेच्या संस्थापक सौ. नेहा पित्रे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ. घोसाळे यांच्या कलाशिक्षिका सौ. स्मिता साळवी, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आंबेशेत ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ. सोनाली घोसाळे, कोषाध्यक्ष सौ. वेदांगी घोसाळे, सेवानिवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी, श्री. परिमल घोसाळे, सौ. किशोरी मयेकर, वृषाली पिळणकर यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता.हा चित्रकला प्रशिक्षण वर्ग दर रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत ऑनेस्ट गुरुकुल शिवाजीनगर, रत्नागिरी येथे सुरू राहणार आहे. सौ. प्रांजल घोसाळे यांना राज्यस्तरीय कलाशिक्षक पुरस्काराने गौरविले गेले आहे. त्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील चित्रकलेबरोबरच विविध माध्यम रंग हाताळणी विषयी मार्गदर्शन करीत असतात. त्याचबरोबर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा विविध सण उत्सवप्रसंगी मुलांकडून एकत्रित कला प्रकल्प तयार करून घेऊन आजचा बालकलाकार भविष्यात उत्तम कलाकार आणि उत्तम कला शिक्षक म्हणून उदयास यावा, या दृष्टीने त्यांच्या कल्पकतेला चालना देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या चित्रकला प्रशिक्षण वर्गात जास्तीत जास्त कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.