सांगली, कोल्हापूर धर्तीवर पूरमुक्तीसाठी निधी मिळवा
सांगली-कोल्हापूर येथील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून ३ हजार २०० कोटींचा विकास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील चिपळूण, खेड, राजापूर या शहरांमधील पूर नियंत्रणासाठी निधी उपलब्ध व्हावा, जेणेकरून ही शहरे पूरमुक्त होतील, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जनतेच्या हितार्थ अनेक योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पाला पाठिंबा देताना आमदार निकम यांनी कोकणातील विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.www.konkantoday.com