शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ पदांची निर्मिती पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी, दि. ८- येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने आज या संदर्भातील शासण निर्णय प्रसिध्द करण्यात आला. या शासन निर्णयात म्हटले आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे सुरु करण्यात आलेल्या ४३० खाटांच्यारुग्णालयाकरिता गट-अ ते गट-क मधील नियमित ५०९ पदेवर्षनिहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच केल्यानुसार वाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेकडून घेण्यास मान्यता देण्यात येतआहे.१) विवरणपत्र “अ” मध्ये नमूद केलेली प्रथम, द्वितीय, तृत्तीय व चतुर्थ टप्यातील पदे टप्पा निहायमंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृत्तीय वचतुर्थ टप्यातील पदे प्रती वर्षी निर्माण होतील.२) सदर पदांच्या वेतनाकरिता संस्था निहाय लेखाशिर्ष व आहरण संवितरण सांकेतांक मंजूर करुनघेण्यात यावे.३) पुढील टप्प्यांच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रती वर्षीच्या अंदाजपत्रकात करण्यात यावी.४) पुढील टप्प्यांच्या पदांचा समावेश प्रतीवर्षी अस्थायी पदांच्या मुदतवाढ प्रस्तावात करण्यात यावा.५) वाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेतांना, वित्त विभागाच्या दि. २७.०४.२०२२ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शकसुचनांचे पालन करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.६) बाह्ययंत्रणेद्वारे ज्या मनुष्यबळ सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्या मनुष्यबळ सेवांचीपरीगणना मंजूर पदे अशी करण्यात येऊ नये.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्धकरण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०७०८१५२२५११६१३ असा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button