लांजा-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतुकीला बंदी
लांजा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्याची दखल घेत अखेर प्रशासनाकडून लांजा-दाभोळे मार्गावर अवजड वाहनांद्वारे केली जाणारी चिरे वाहतूक ही गुरूवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या मागणीला यश आले आहे.तालुक्यात सापुचेतळे परिसरात भरपावसात चिरेखाणी सुरू आहेत. याच चिरेखाणीतून मोठ्या प्रमाणात १६ चाकी ट्रक या अवजड वाहनांद्वारे चिरे वाहतूक केली जात होती. या वाहतुकीमुळे लांजा-दाभोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातचे प्रमाणही वाढीस लागले आहे.www.konkantoday.com