राजापुरातील शिवकालीन वखारीच्या पुनर्निर्माणाला चालना
राजापूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या ब्रिटीशकालीन वखारीच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असुन एमटीडीसी मार्फत या कामाचा प्रारूप आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजापूरच्या या ऐतिहासिक ठेव्याच्या पुनर्निर्माणला चालना मिळणार आहे.छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूर शहरात शिवकालीन इंग्रज वखार आहे. सिद्दीजौहरने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी राजापूर फॅक्टरीतील इंग्रज अधिकारी रेव्हिंगटन याने सिद्दी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा पुरविल्या होत्या. त्यामुळे महाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती. पन्हाळागडाच्या वेढ्यातून महाराज सुखरूप सुटल्यावर १६६१ मध्ये इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी छ. शिवाजी राजापूरात आले आणि वखार लुटली. इंग्रजांचा बिमोड केल्यानंतर अल्पावधीतच ही वखार बंद पडली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे तिचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातत्व विभागाचे याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ही वखार नामशेष झाली आहे.www.konkantoday.com