मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी रेल्वेट्रॅक वरून निघाले चालत! मुसळधार पावसाचा फटका!!
मुंबईत तुफान पाऊस पडला आहे. सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाचा फटका बसला आहेच. पण आमदार आणि मंत्रीही त्यातून सुटलेले नाही. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील रेल्वे ट्रॅकवरुन चालत निघाले. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान या दोघांनीही चालत प्रवास सुरु केला. त्यानंतर पुढे उभी असलेली ट्रेन गाठली आणि त्यानंतर अधिवेशनात पोहचले. सामान्य नागरिकांप्रमाणेच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना पावसाचा फटका बसला आहे.*