
पीरलोटे अपघातातील जखमी वृद्धाचा अखेर मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध दुचाकीस्वाराचा अखेर मृत्यू झाला. तापस अवनी चौधरी (७०, रा. पीरलोटे, नवी वसाहत) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.स्वीफ्ट डिझायर कारचालक हितेश रामप्पा अमिन (कर्नाटक) हे स्वीफ्ट डिझायर कार (एम.एच. ०४/बीई ८९५२) घेवून जात असताना पीरलोटे येथील सर्व्हिस रोडवर दुचाकीवरून (एम.एच. ०८/ए.एम ०६२९) जाणार्या वृद्धाने कारला धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत वृद्धावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com