
नवीन उद्योग भवन इमारतीस ३६ कोटी १५ लाख ७८ हजार २६८ रुपयांची प्रशासकीय मान्यता पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी, दि. ८ (- येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत होणाऱ्या एकूण ६९०३.५४ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळावर रु.२८ हजार प्रती चौ.मी. या दराने एकूण रु.३६ कोटी १५ लाख ७८ हजार २६८ इतक्या रकमेच्या नवीन उद्योग भवन इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे कार्यासन अधिकारी शशांक चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे, जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत होणाऱ्या एकूण ६९०३.५४ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळावर रु.२८ हजार प्रती चौ.मी. या दराने एकूण रु.३६ कोटी १५ लाख ७८ हजार २६८ इतक्या रकमेच्या नवीन उद्योग भवन इमारतीच्या बांधकामास याद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. सदर उद्योग भवनइमारतीसंदर्भात करावयाच्या बांधकामाचे विवरण परिशिष्ट अ प्रमाणे राहील. उद्योग भवन इमारतीसाठी सोलर यंत्रणेचा वापर करण्यात यावा. हे काम खासगी वास्तुशास्त्रज्ञाकडून करण्यात येत असल्याने, त्या इमारतीचे हे सार्वजनिक बांधकाम विभाग/ शासकीय इमारतीच्या अनुज्ञेय मानकास अनुसरून असण्याची खातरजमा करावी. अशा नकाशांना व वास्तुमांडणी आराखड्यास शासनाचे वास्तुशास्त्रज्ञ यांची मान्यता घेण्याची कार्यवाही उद्योग संचालनालयानेकरावी. प्रस्तावित करण्यात आलेल्या इमारतीचे जोते क्षेत्रफळ कर्मचारी वर्ग व शासकीय इमारती यांच्या अनुज्ञेय मानकाप्रमाणे असल्याची खातरजमा करण्याच्या अटीच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत आहे. तांत्रिक मंजुरी देताना राज्य दर सूची बाह्य बाबींच्या दराकरिता शासन परिपत्रक क्र.२०१७/प्र.क्र. ११/नियोजन-३, दि. ११.०४.२०१७ अनुसार कार्यवाही करण्यात यावी. प्रस्तावित प्रस्तावातील खरेदीशी संबंधित बाबींकरिता ई-निविदा प्रणालीचा अवलंब करुन विभागाच्यादि.२४.०८.२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील निर्गमित सूचना विचारात घ्याव्यात. स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरणाबाबत, तसेच इतर अनुषंगिक कामांचे योग्य नियोजन करुन सदर कामे पूर्ण करण्यात यावीत.इमारतीमध्ये दिव्यांगाकरिता उपलब्ध करुन द्यावयाच्या विविध सोयींबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्यासूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०७०८१३००४४४२१० असा आहे.