त्या पोलिसाला मुंबई पोलीस दलाकडून त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित
आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाची मुंबईत विजयी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती. या गर्दी दरम्यान अनेकांचे श्वास गुदमरले होते तर एक महिला बेशुद्ध पडल्याचीही घटना घडली होती.या बेशुद्ध झालेल्या महिलेचा मुंबई पोलीस दलातील एका पोलिसांने जीव वाचवला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. पोलिसाच्या या कामगिरीनंतर मुंबई पोलीस दलाकडून त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले होते.टीम इंडियाच्या विजयी रॅली दरम्यान मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीमुळे अनेकांचे श्वास गुदमरल्याचे आणि बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र तरीही गर्दीवर नियंत्रण ठेवून मुंबई पोलिसांनी मुंबईकरांचे मोठ्या दुर्घटनेपासून संरक्षण केले होते.या गर्दीच्या दरम्यान एक महिला बेशुद्ध पडली होती. या बेशुद्ध पडलेल्या महिलेला पोलिसाने खांद्यावर नेत एका सुरक्षित स्थळी तिला सोडले होते. या संदर्भातला पोलिसाचा सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या पोलिसाचे नाव सईद सलिम पिंजारी आहे. या पोलिसाने महिलेचे जीव वाचवल्याप्रकरणी आता त्याला मुंबई पोलीस दलातर्फे मॅन ऑफ द मॅच देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एक्सवर या संदर्भात माहिती दिली आहे