
जीवाचे माचाळ करण्यासाठी गेलेल्या तिघांना माचाळ वासियांनी चांगलाच धडा शिकवला
माचाळ येथे फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक महिलेला जेवणाची ऑर्डर देऊन त्यानंतर जेवणाचे पैसे देण्याऐवजी त्या महिलेलाच नवीन मीटर देण्याचे आश्वासन देत दोन हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता .मात्र हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी हाणून पडतानाच लांजातील तिघां पर्यटकांना आपल्या पद्धतीने चांगला दणका दिला शुक्रवारी ५ जुलै रोजी ही घटना घडली आहे.माचाळ हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात माचाळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पर्यटक येत असतात. शुक्रवारी लांजा येथील तिघेजण माचाळ या ठिकाणी गेले होते. येथील निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर येथील स्थानिक पाटील नमक महिलेला जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी घरात अन्य कोणी नसल्याने जेवण झाल्यानंतर पैसे न देता पळण्याच्या तयारीत होते. मात्र संबंधित महिलेने जेवणाचे पैसे मागितले असता संबंधित महिलेला तुमचा आहे वीज मीटर हा फॉल्टी आहेत्यामुळे तुमचे लाईट बिल जास्त येत आहे. नवीन मीटर घ्यायचा असेल तर तुम्हाला २० हजार रुपये द्यावे लागतील. मी तुम्हाला लांजातून नवीन मीटर आणून देतो असे सांगितले. मात्र संबंधित महिलेने इतकी रक्कम माझ्याकडे नाहीकेवळ दोन हजार रुपये आहेत सांगितले.संबंधित व्यक्तींने हे दोन हजार रुपये तिच्याकडून घेतले व आपल्या गाडीने पळण्याच्या प्रयत्नात असताना याच कालावधीत शेतीसाठी बाहेर पडलेले घरातील माणसे तसेच आजूबाजू शेजारी पाजारी गोळा झाले. यावेळी संबंधित महिलेनेआपल्याकडून दोन हजार रुपये घेतले, तसेच जेवणाचे पैसे देखील दिले नाहीत असे सांगितले .त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी पर्यटक म्हणून गेलेल्या लांजातील तिघांना चांगलाच जाब विचारला. अरेरावी करणार्यांना चांगला दणका दिल्यानंतर महिलेने त्यांना दिलेले दोन हजार रुपये परत घेतले.अशाप्रकारे जीवाचे माचाळ करण्यासाठी गेलेल्या तिघांना माचाळ वासियांनी चांगलाच धडा शिकवला असून याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.www.konkantoday.com