जिल्हा नियोजन समितीची १५ जुलैला बैठक
*रत्नागिरी, दि. 8 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी कळविले आहे.*