
घराला पाण्याचा वेढा, कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात आपत्ती यंत्रणेला यश
दापोली :-* दापोलीत पावसाचा जोर कायम असून रविवारी रात्री अचानक टाळसुरे येथील एका घराला पाण्याने वेढा दिल्याने घरातील सदस्य अडकून होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आपत्ती यंत्रणेला यश आले आहे.रविवारी रात्री 10:30 वा. मौजे टाळसुरे येथील मेडिकल कॉलेज बस स्टॉपच्या पाठीमागील राहणारे करमरकर कुटुंबीय यांचे घराजवळ पाणी भरलेले असल्याने सदर कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात येऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. एकाच घरात राहणारी दोन कुटुंबातील मयुरेश देविदास करमरकर (वय 37), देविदास गणपत करमरकर (वय 74), प्रमिला देविदास करमरकर (वय 60), अजित नारायण जोशी (वय 72), अश्विनी अनुप जोशी (वय 35), अनय अनुप जोशी (वय 6) या सर्वाना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले




