उर्दू शाळेत हजर झालेल्या दोन मराठी शिक्षकांना विरोध
दोन मराठी शिक्षकांचे त्यांच्या लहानपणी उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण झालेले नाही, असे कारण देत दापोली तालुक्यातील हर्णै येथील स्थानिकांनी उर्दू शाळेत दाखल होण्यासाठी आलेल्या दोन महिला शिक्षकांना हजर करून घेण्यास विरोध केला. त्याचबरोबर जर हे शिक्षक शाळेत हजर झाले तर आपण मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका घेतली. स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नरमलेल्या शिक्षण विभागाला अखेर या दोन्ही शिक्षकांना दुसर्या ठिकाणी कामगिरीवर काढण्याची वेळ आली. हर्णै येथे उर्दू प्राथमिक शाळा आहे. येथे दोन विषय शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. यासाठी विदर्भातून दोन विषय शिक्षक येथे रूजू झाले. रूजू झाल्यानंतर अनेक पालक या शाळेमध्ये दाखल झाले. हे दोन्ही शिक्षक उच्च विद्याविभूषित व त्यांच्या विषयात पारंगत होते. तरी देखील या दोन शिक्षकांचे लहानपणी शिक्षण उदू माध्यमातून झालेले नाही, असा अनेक पालकांनी आक्षेप घेतला. उर्दू माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झालेले नसल्यामुळे एखादा विषय आमच्या मुलांना शिकवण्यात यांना अडचणी निर्माण होतील असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र त्या शिक्षकांची तेथे नियुक्ती झालेली असल्याने त्यांना तेथेच रूजू करून घ्यावे, असा आग्रह शिक्षण विभागाने धरला. यावर जर हे शिक्षक आमच्या शाळेतदाखल झाले तर आम्ही शाळेत मुलांना पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली. अखेर दापोली शिक्षण विभागाने नाईलाजाने या दोन शिक्षकांना अन्य शाळेमध्ये रूजू केले.www.konkantoday.com