उड्डाण पूल कामात सुरक्षितता बाळगा आ. शेखर निकम यांच्या सूचना, दुर्घटनेची घेतली दखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून शहरातूनजाणाऱ्या उड्डाण पुलाच्या पिअर कॅपचे कटिंग सुरू असताना शुक्रवारी अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या तिघा कामगारांची प्रकृती स्थिर आहे. – दरम्यान महामार्गाचे काम करताना सरक्षितता बाळगा, सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला दिल्या आहेत. त्यानुसार ठेकेदार कंपनीनेही येथे बॅरिकेट्स लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना दुसऱ्यांदा अपघात घडला. सुदैवाने उड्डाणपुलाच्या पिअर कॅपचे कटिंग सुरू असताना कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेनंतर शनिवारी – आमदार शेखर निकम यांनी – दुर्घटनेबाबत येथील अधिकाऱ्यांशी – चर्चा केली. यापुढे महामार्ग उड्डण – पुलाचे कामे करताना जनतेला, – तेथून जाणाऱ्या वाहनालकांना – कोणताही त्रास होता कामा नये, – यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूने पत्रा ठोकून आतमध्ये कामे करावीत, सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कंत्राटदार कंपनीला नोटीस देण्यात यावी, अशा सूचना आमदार निकम यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांना केली.शहरात उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेल्या पिलरवर • बसवण्यात आलेले पिअर कॅप पुलाच्या नव्या डिझाईननुसार तोडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. एकूण ४६ पिलरपैकी आतापर्यत १६ कॅप तोडण्यात आलेल्या आहेत. शुक्रवारी बांधकाम भवन समोरील सोळाव्या पिलरवरील पिअर कॅप तोडत असताना अचानकपणे त्याला लावलेल्या क्रेनचे चार पैकी एक हूक निसटल्याने कॅप एका बाजूला कलंडली. त्यावर काम करणारे दोन कामगार तब्बल३३ फुटावरून कोसळून गंभीर जखमी झाले. तर कें पच्या सळ्यांमध्ये अडकून पडलेल्या तिसऱ्या कामगाराची दुसऱ्या क्रेनने सुटका करण्यात आली. जखमी झालेल्यांमध्ये विषणलाल युईके २८, शिवारण सिंगराम २४, नीरज युईके २०, सर्व राहणार जबलपूर अशी या कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपार सुरू आहेत. या तिन्ही कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांत कंपनीकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप उपस्थितांकडून करण्यात आला. उपस्थितांनी कंपनीच्या कामावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला. यापुढे ज्या ठिकाणी उड्डाण पुलासंदर्भात काम सुरू असेल तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटस् लावून आतमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी दुर्घटना घडल्यानंतर काहीसे थांबलेले पिअर कैंप तोडण्याचे काम शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आले.