आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी रात्री ही घटना घडली.आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. दगडफेक झाली तेव्हा गाडीत शिरसाट याची पत्नी,कन्या आणि मुलगा होता, अशी प्राथमिक माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिलीरस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याचे समजते. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले.आमदार शिरसाट यांच्या गाडीवर दगड कुणी भिरकावला, याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेनं संभाजीनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button