
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी, महामार्गावर पाणी तर काहींच्या घरात पाणी शिरले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले.परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पावसामुळे ओरोस येथील जिजामाता चौक येथे मुंबई- गोवा महामार्गावर दुपारी पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गावर अंदाजे २ ते ३ फुटापर्यंत पाणी आले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे.