लांजा तालुक्यातील फणस संशोधन केंद्राला ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची आ. शेखर निकम यांची मागणी
लांजा तालुक्यातील फणस संशोधन केंद्राच्या रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली आहे. विधानसभेच्या पावसाळी, अर्थसंकल्पयीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी केंद्रासाठी ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे.कोकण कृषि विद्यापीठाने ४० कोटी रुपयांच्या फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाने पाठविला होता. निधी उपलब्ध नसल्याने विद्यापीठाच्या मागणीची दखल राज्य शासनाने घेतली नाही, पत्रकार परिषदेचे सिराज नेवरेकर यांनी आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी यांच्याकडे केंद्रासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली होती.आमदार शेखरनिकम यांनी आपल्या भाषणात केंद्रासाठी ४० कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. देवरूख येथील सायन्स ऍण्ड इनोव्हेशन सेंटरमध्ये एनईपीसी, विज्ञान विषयक प्रयोगशाळा सुरू करण्याच्या मागणीला आ. शेखर निकम यांनी पाठिंबा दिला आहे. व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना राज्य शासनामार्फत मोफत शिक्षण दिले जात आहे. दोन वर्षापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनींना याचा लाभ मिळावा अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे.www.konkantoday.com