लांजा तालुक्यातील खावडी पिलकेवाडी येथून वृद्ध महिला बेपत्ता
लांजा तालुक्यातील खावडी पिलकेवाडी येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली असून ती डॉक्टरकडे जाते असे सांगून निघून गेली. मात्र घरात न परतल्याने तिच्या दिराने लांजा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार चंद्रभागा वासुदेव पिलके (६५, रा. गावखडी, पिलकेवाडी, ता. लांजा) ही २० जुन रोजी सकाळी १० च्या सुमारास घरातून निघताना तिचा दिर रघुनाथ पिलके यांची पत्नी रसिका रघुनाथ पिलके हिला गोंडेसखल लांजा येथील डॉ. श्रोत्रे यांच्याकडे औषध आणण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली ती घरी परत आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर रघुनाथ पिलके यांनी २३ जून रोजी लांजा पोलीस स्थानकात चंद्रभागा पिलके ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.www.konkantoday.com