
दोन वर्षानंतर फळांचा राजा हापूस अमेरिकेच्या वारीवर जाणार
यंदा अनेक संकटावर मात करीत गतमहिन्यातच फळांचा राजा हापुस मुंबई बाजारपेठेत दाखल झाला होता. देशाअंतर्गत बाजारपेठेत तर निर्यातीचा मार्ग खुला झाला होता.पण परदेशातील खवय्ये गेल्या दोन वर्षापासून या रसाळ आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले होते. अखेर दोन वर्षानंतर फळांचा राजा हापूस हा अमेरिकेच्या वारीवर जाणार आहे. निर्याती संबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून अमेरिकेतील ग्राहकांना दोन वर्षानंतर हापूसची चव चाखता येणार आहे. ज्याप्रमाणे देशातील मुख्य बाजारपेठेतील ग्राहक हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात अशीच स्थिती अमेरिकेतही असते पण कोरोनाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे निर्यात ही रोखण्यात आली होती अखेर अमेरिकेतील कृषी विभागाने आयातीस परवानगी दिल्याने निर्यातीचा मार्ग खुला झाला असल्याचे आंबा बागायत संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
www.konkantoday.com