रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या रूग्णवाहिका १० वर्ष जुन्या झाल्याने नव्याने खरेदीची आवश्यकता
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्वाकांक्षी उपक्रमांसह महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने जून २०२४ या १० वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील २,११,४२५ रूग्णांसाठी लाईफलाईन ठरली आहे. या सेवेने राज्यातील १ कोटीहून अधिक रूग्णांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या आहेत. १०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचविणारी जीवनदायीनी ठरली आहे. मात्र योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे जवळजवळ सर्वच रूग्णवाहिका नादुरूस्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने रूग्णांसह रूग्णवाहिका चालक, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी नव्या रूग्णवाहिका खरेदी करण्याची आवश्यकता आहे. www.konkantoday.com