रत्नागिरी तालुक्यातील भोके रेवाळेवाडी येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील भोके रेवाळेवाडी येथे आजाराला कंटाळून वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. राम बाळू रेवाळे (८०,रा. भोके रेवाळेवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम रेवाळे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र यातून ते बरे होत नसल्याने आजारपणाला कंटाळून ते बरे होत नसल्याने आजारपणाला कंटाळून गेले होते. याच कारणातून २ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. यावेळी त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले. उपचारादरम्यान राम रेवाळे यांचा मृत्यू झाला अशी नोंद झाली आहे. www.konkantoday.com