मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्डमधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत निशुल्क
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करुन घेत आहेत. तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत. या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं. पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्डमधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे.