
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यापेक्षा गटारे उंच बांधल्याने साचतेय पाणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत उभारलेली गटारे रस्त्यापेक्षा उंच असल्याने त्याचा उलटा परिणाम होवू लागला आहे. अनेक ठिकाणी महामार्गावरच पाणी साचत असल्याने त्याचा वाहनधारकांनाही फटका बसत आहे. शिवाय अधूनमधून रस्त्यावर साचलेले पाणी अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे हे पाणी सध्या डोकेदुखी ठरू लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याविषयी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. www.konkantoday.com