
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे घाटातील दरड हटवण्यात यश; दोन्ही बाजूकडील वाहतुक सुरळीत सुरू
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील यंत्रसामग्रीने (जेसीबी) दरड बाजूला करण्यात आली आहे. दरड बाजूला करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूकडील वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे. आज सहा जुलै शनिवार रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र प्रसंगावधान जाणून महामार्गावरील कामगाराने तात्काळ जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाभोळे महामार्ग मृत्युंजय दूध ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, काका हिरवे आणि रविंद्र सुकम यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतुकीचे नियमन केले.




