
शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यावतीने आज सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने परत खळबळ
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अजून कोणत्या पक्षाला जाणार, हे निश्चित झाले नसले तरी शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यावतीने आज सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्यात आला.एका बाजूला या जागेसाठी भाजपचा आग्रह असताना आणि भाजपकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात असताना शिंदेसेनेच्या उमेदवाराने अर्ज घेणे हे खळबळ उडवून देणारे ठरत आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अनेक दिवस केवळ चर्चा सुरू आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक कोण लढवणार, हे अजूनही निश्चित झालेले नाही. भाजप या जागेसाठी टोकाचा आग्रह धरून आहे. त्याचवेळी शिंदेसेनेनेही हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा, यासाठी आग्रही आहे.एका बाजूला भाजपकडून जोरदार प्रचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यावतीने जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हा उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत अधिक वाढणार आहे.
www.konkantoday.com