जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रूग्णवाहिका चालकांचे थकित वेतन तत्काळ देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
जि.प. आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रूग्णवाहिका सेवा बजावणार्या चालकांना मार्च महिन्याचे थकित वेतन तत्काळ द्या, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्याने जिल्ह्यातील कंत्राटी रूग्णवाहिका चालकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.जिल्ह्यातील ६७ जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रूग्णवाहिकांद्वारे २४ तास सेवा देणार्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे वेतन गेले ३ महिने थकले आहे. त्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच जि.प.च्या माध्यमातून पर्यायी निधी उपलब्ध करून वेतन द्यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. www.konkantoday.com