ग्रामपंचायत कापडगाव येथे मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांचे उपस्थितीत मार्गदर्शन

ग्रामपंचायत कापडगाव ता.जि रत्नागिरी काल ग्रामपंचायत कापडगांव येथे जल शक्ती अभियान अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कापडगाव येथे वृक्षलागवड करताना 100 झाडे लावण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, सोनचाफा, गुलमोहर यांची प्रामुख्याने लागवड करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन गटविकास अधिकारी (नि.श्रे. वर्ग -१) – जे.पी जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी – मा. श्री. किर्ती किरण पुजार सर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी – मा.श्री परीक्षित यादव सर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग – पाटील सर, पंचायत समिती रत्नागिरीचे गटविकास अधिकारी (नि.श्रे. वर्ग -१) – जे.पी जाधव साहेब, ग्रा.पं सरपंच – मा. श्री. विघ्नेश कोत्रे, उपसरपंच – श्रीम. सपना पेजे व ग्रामपंचायत सर्व सदस्य,ग्रामसेविका, पंचायत समिती कृषी अधिकारी – बागडे साहेब, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी – कांबळे साहेब व शिंदे साहेब, कृषीसहाय्यक, आरोग्य अधिकारी,गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, तसेच डी. जे. सामंत NSS विभाग प्राध्यापक श्री. सुदीप पवार सर आणि NSS चे विद्यार्थी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button