
गणपतीपुळेत मुंबई येथून देवदर्शनाला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू
गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ३० जून २०२४ रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. संजय भालचंद्र पितळे (५८, रा. गिरगाव, मुंबई) असे या पर्यटकाचे नाव आहे. या घटनेची नोंद जययगड पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पितळे हे ३० जून रोजी मुंबई येथून गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. सकाळी ७ च्या सुमारास देवदर्शन झाल्यानंतर ते निवेंडी येथे आपल्या मित्राकडे वास्तव्यासाठी गेले होते. रात्री ११ च्या सुमारास त्यांच्या छातीध्ये कळा येण्यास सुरूवात झाली. यावेळी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकार्यांनी संजय पितळे यांना तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com