अंजनवेल पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन
रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील मौजे अंजनवेल गावात जलजीवन योजनेचे ७० टक्के, तर पेठ अंजनवेल गावात १० टक्के काम झाले. या योजनेसाठी ग्रामपंचायतींसाठी ७६ लाख रुपये मंजूर झाले. लवकरच काम पूर्ण करून ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करू, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.संबंधित गावातील योजनेतील तांत्रिक त्रुटीची मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.www.konkantoday.com