वाशिष्ठी नदी चिपळूण नगरपालिकेकडूनच विविध बांधकामाचा घाट

लाल व निळी पूररेषा टांगती तलवार चिपळूण शहरावर आहे. महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ आणि नदीतील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता चक्क चिपळूण नगर पालिकेकडूनच शहरातील विविध भागात वाशिष्ठी नदीत गणपती विसर्जन घाट, धोबी घाट, आर.सी.सी. संरक्षक भिंत घालण्याचा नवा घाट सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही बांधकामे म्हणजे भविष्यात चिपळूणवासियांसाठी मोठा धोका असल्याचे संगेत देत जलदूत व वाशिष्ठी जगबुडी नदीप्रहरी सदस्य शाहनवाज शाह यांनी या बांधकामाव आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी, तसेच जलसंपदा विभागाकडे त्यासंदर्भात तक्रार करून या कामांची तातडीने चौकशी करावी व नदी पात्रातील बांधकाम काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button