रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांना सप्टेंबर २०२४ ची डेडलाईन
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे सप्टेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची अखेरची मुदत जिल्हा परिषद प्रशासनस्तरावरून देण्यात आली आहे. जिल्हयात एकूण १,४३२ जलजीवन योजनेच्या कामांपैकी आतापर्यंत ४०० योजनांची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित ९८७ कामे येत्या ३ महिन्यात पूर्ण करावी लागणार असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले.www.konkantoday.com