माझं डोअर तुटल्यानंतर मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.. त्यात मी यशस्वी झालो.. विमानातील एकमेव वाचलेल्या रमेश विश्वकुमार सांगितला प्रत्यक्ष अनुभव


अहमदाबाद विमान अपघातामध्ये २४२ प्रवाशांपैकी केवळ एकाचा जीव वाचला आहे. केवळ एका मिनिटामध्ये झालेल्या या अपघातात रमेश विश्वकुमार नेमका कसा वाचला, हे त्यानेच सांगितलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे जाऊन जखमींची विचारपासू केली. रमेश विश्वकुमार याच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. रमेश विश्वकुमार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रमेश विश्वकुमार म्हणाला की, विमानानेटेक ऑफ झाल्यानंतर एका मिनिटाच्या आतच प्लेन स्टक झाल्याचं जाणवत होतं. त्यानंतर प्लेनमध्ये ग्रीन आणि व्हाईट लाईट ऑन झाल्या. परंतु उड्डाणासाठी एनर्जी मिळत नसल्याचं जाणवत होतं.. उड्डाण व्हावं, यासाठी अतिरिक्त ऊर्जा दिल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर हे प्लेन एका इमारतीवर कोसळलं.

रमेश विश्वकुमार पुढे सांगतो, प्लेन क्रॅश झालं.. पण मी ज्या साईडला होतो ती साईट हॉस्टेलवर कोसळलीच नव्हती. हॉस्टेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर मी आदळलो. माझं डोअर तुटल्यानंतर मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.. त्यात मी यशस्वी झालो.. मी बाहेर पडलो. दुसऱ्या बाजूला कुठूनच बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. मी कसा वाचलो हे मलाच सांगता येत नाहीये.

माझ्या नजरेच्या समोरच्या एअर होस्टेस आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्या होत्या. आग लागली तेव्हा माझा डावा हात भाजला. मी स्वतःहून प्लेनमधून बाहेर पडल्ायनंतर रुग्णवाहिकेने मला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. इथे माझ्यावर योग्यरित्या उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button