मतदार पदवीधर असूनही कोकण पदवीधर मतदार संघात ११ हजार २२६ मते बाद

कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे महायुतीचे निरंजन डावखरे यांना १ लाख ७२१ मते मिळून त्यांचा विजय झाला. कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना अवघी २८ हजार ५८५ मते मिळाली व इतर ११ उमेदवारांचे डिपॉझीटही जप्त झाले. सुशिक्षितांचा मतदार संघ असलेल्या या मतदार संघात १ लाख ४३ हजार २५७ मतदान झाले होते. निवडणुकीत ११ हजार २२६ मते बाद झाली. ग्रामीण भागातील व काही ठिकाणी अशिक्षित मतदारांमुळे मते बाद होतात हा जुना अनुभव आहे. मात्र सुशिक्षितांची मते कशी बाद झाली याचा उलगडा कोणालाच झाला नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button