चिपळूणात बिल्डरचा पराक्रम, एका पिलरवर वन बीएचके
चिपळूणात बिल्डरचा पराक्रम, एका पिलरवर वन बीएचकेचिपळूण शहरातील पाग येथे पॉवर हाऊस ते उघडा मारूती मंदिराकडे जाणार्या मार्गावर एका चिंचोळ्या जागेत एक अनधिकृतपणे इमारत उभी राहात आहे. या इमारतीबाबत वृत्त प्रसिद्ध होताच याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. बुधवारी ही इमारत खास पाहण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी आले होते. एका पिलरवर वन बीएचके, अशी ही आगळीवेगळी इमारत पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली.www.konkantoday.com