
चिपळुणातील अतिक्रमणाबाबत पोलीस यंत्रणेकडून गंभीर दखल
चिपळूण शहरातील चिंचनाका ते भेंडीनाका येथे होणार्या वाहतूक कोंडीची पोलीस यंत्रणेनेने गंभीर दखल घेतली आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ही समस्या निर्माण होत असल्याने ती तातडीने हटवावीत, तसेच अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी, असे पत्र पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिले आहे. यामुळे आता पालिका प्रशासनही ऍक्शन मोडवर आले असून लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.www.konkantoday.com