
खेड शहरातील जगन्नाथ कॉम्प्लेक्स येथे उभी करून ठेवलेली अज्ञाताने दुचाकी लांबवली
खेड शहरातील जगन्नाथ कॉम्प्लेक्स येथे उभी करून ठेवलेली १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्याने लांबविल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूषाली अरविंद तलाठी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यांनी एम.एच. ०८ वाय ८८६६ क्रमांकाची दुचाकी उभी करून ठेवली असता चोरट्याने चोरून नेली. दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली.www.konkantoday.com