खेडमध्ये ८३ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवूनही लाल फितीत अडकले

खेड तालुक्यातील शिरवली नं. १ प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे खत कोसळल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. तालुक्यातील ८३ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले आहेत. मात्र हे प्रस्ताव लालफितीत अडकून पडले आहेत. निधीच्या तुटवड्याचे तुणतुणे वाजवण्यातच धन्यता मानणार्‍या शिक्षण विभागाचा एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शाळा दुरूस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची तसदी अद्याप घेण्यात आलेली नाही. यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या शाळा दुरूस्तीत नापास झाल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button