
नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग माेकळा, मिळाली हक्काची जागा.
नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग माेकळा झाला असून एमआयडीसीने उद्यमनगर चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या कराराने वैद्यकीय महाविद्यालयाला दिली आहे. या ठिकाणी जेआयसीएच्या माध्यमातून 650 काेटी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत उभी राहाणार आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरूवात हाेणार असून, पुढील चार वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची टाेलेजंग इमारत शहराच्या वैभवात भर घालणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय मंजूर झाले. जागेची उपलब्धता हाेत नसल्याने महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला विलंब झाला.
दाेन वर्षांपूर्वी महिला रूग्णालयाच्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सलग दाेन वर्षे तेथे अभ्यासक्रम सुरू आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी 20 एकर जागा आवश्यक हाेती. शहरानजिक एवढ्या माेठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम रखडले हाेते. उद्याेगमंत्री ना. उदय सामंत यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्यमनगर येथील स्टरलाईट कंपनीच्या ताब्यातं असलेली अडीचशे हेक्टर जागा न्यायालयीन लढाई पूर्ण करून एमआयडीसीच्या ताब्यात घेतली. राज्यात प्रथमच एमआयडीसीच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय उद्याेग विभागाने घेतला. त्यानुसार एमआयडीसीने 20 एकर जागा 99 वर्षे कराराने नाममात्र दरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली आहे. याबाबतचा लेखी करार पूर्ण झाला असून जागेचा ताबा वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला आहे.www.konkantoday.com