स्थलांतराच्या नोटीसा, पण जायचं कुठे? दरडग्रस्त ठरलेल्या ग्रामस्थांसमोर पेच

चिपळूण शहरातील विविध भागातील १३४ घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे त्यांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीसा चिपळूण नगर पालिकेने यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र अनेकांकडे राहण्याची अन्य व्यवस्था नसल्याने ही कुटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने जायचं कुठे, असा पेच या दरडग्रस्त कुटुंबांना निर्माण झाला आहे.चिपळूण शहरातील काही वस्त्या डोंगर भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार १३४ घरांना दरडींचा धोका असल्याचे दिसून आले. त्यामुळे नगर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना नोटीसा देवून पावसाळ्यात या घरांमधून स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अनेकांकडे अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्याने ते त्याच घरांमध्ये भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button