रस्ता कॉंक्रीटीकरणामुळे रत्नागिरी नगर पालिका कर्जाच्या ओझ्याखाली, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा आरोप
रत्नागिरी शहरामध्ये साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेवून निवेदन दिले.निवेदनामध्ये कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे रत्नागिरीकरांना कर्जाच्या खाईत लोटले असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी १५ कोटी रुपये हे नगर परिषदेचे कर्जरूपाने उभारण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात आधीच देणेकरी झालेली रत्नागिरी नगर परिषद आर्थिक संकटात सापडणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. www.konkantoday.com